मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर…. शिरूर – डॉ.अमोल कोल्हे, नाशिक – समीर भुजबळ, मावळ मधून अपेक्षित पार्थ अजित पवार यांना उमेदवारी

मुंबई :(रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)

राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी ५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून मावळ मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे शिरूर व मावळ मतदारसंघात चुरस वाढली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज तसेच संभाजी महाराजांच्या भूमिकांमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांना शिरुर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. कोल्हे यांनी अलीकडेच शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ते शिरुर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढणार असल्याची आधीपासूनच चर्चा होती.

राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत समीर भुजबळ हे आणखी एक महत्त्वाचे नाव असून समीर यांना पुन्हा एकदा नाशिक मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादीने धनराज महाले यांना तिकीट दिलं आहे तर बीड या आणखी एका प्रतिष्ठेच्या मतदारसंघात बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.राष्ट्रवादीच्या कोट्यातील माढा आणि अहमदनगर या दोन प्रमुख मतदारसंघातील उमेदवार अद्याप जाहीर करण्यात आलेले नसून या दोन मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार कोण असणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

डॉ अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात होणार घनघोर संग्राम….

राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली असून शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आलीय. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिलीय. युतीत हा मतदारसंघ युतीकडे असून तिथे खा. शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात तुंबळ लढाई होणार आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील एकूण तीन वेळा व शिरूरमधून 2 वेळा खासदार झाल्यानं मतदारसंघावर त्यांची चांगली पकड आहे. त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. अमोल कोल्हे यांना तिथे शिवाजीरावांचं जबरदस्त आव्हान पेलावं लागणार असून या लढतीकडे पुणे जिल्ह्याच लक्ष लागले आहे.

0 0 votes
Article Rating
3 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments