🚨 बारामतीत भावनिक क्षण… सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू 🚨
बारामती पोटनिवडणुकीच्या सांगता सभेत
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. 😢
सभेत बोलताना त्यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला
आणि म्हणाल्या— “मी माझं सर्वस्व गमावलं आहे…”
जनसागरासमोर बोलताना त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.
बारामतीकर अजूनही दादांच्या आठवणीत असल्याचं त्यांनी सांगितलं.
👉 “बारामतीला देशात नंबर 1 करण्याचं स्वप्न दादांचं होतं”
👉 “त्यांच्या अपूर्ण स्वप्नांसाठी मी रणांगणात उतरली आहे”
सर्व पक्षांच्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार मानले
आणि बारामतीकरांचा विश्वास कायम ठेवण्याचं आश्वासन दिलं.
🔥 बारामतीतील ही सभा भावनिक वातावरणात पार पडली.
