पुणे

मैत्रीतून खून! कचरा डेपोजवळ तरुणीचा मृतदेह; आरोपी अटकेत

पुण्यातील मुंढवा परिसरात एक खळबळजनक हत्या उघडकीस आली आहे.
केशवनगर कचरा डेपोजवळ रस्त्याच्या कडेला एका तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
मृत तरुणीची ओळख आफरीन पठाण अशी झाली असून ती ब्युटीपार्लर चालवत होती.
ससून रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालात तिचा गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट झाले.

गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी गोरखनाथ शिंदे याची कार दिसून आली.
चौकशीत आरोपीने धक्कादायक कबुली दिली.
दोघांमध्ये मैत्रीचे संबंध होते. पैशांच्या वादातून आफरीनने कुटुंबीयांना माहिती देण्याची धमकी दिल्यानंतर संतापलेल्या आरोपीने तिचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह कचरा डेपोजवळ फेकून दिला.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.