पुणे

उरुळी कांचनमध्ये जमिनीच्या पैशांवरून रक्तरंजित वाद; पती-पत्नीला बेदम मारहाण

पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचनमध्ये वडिलोपार्जित जमिनीच्या पैशांवरून कौटुंबिक वाद पेटला असून पती-पत्नीला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
योगेश विलास ननावरे हे त्यांच्या लेडीज शॉपीच्या दुकानात काम करत असताना जमिनीच्या पैशांच्या कारणावरून वाद झाला.
वाद इतका वाढला की अर्थव गणेश ननावरे, प्रथमेश गणेश ननावरे, गणेश विलास ननावरे, अलका गणेश ननावरे, आदित्य शरद कदम आणि दिपाली शरद कदम यांनी मिळून योगेश ननावरे आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याचा आरोप आहे.

मारहाणी दरम्यान योगेश ननावरे यांना जमिनीवर पाडण्यात आले.
यावेळी आदित्य कदम याने सिमेंटच्या डंबेलने त्यांच्या नाकावर जोरात प्रहार केला. या हल्ल्यात योगेश यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली आहे.
या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी सहाही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.