आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला… पण खरा टर्निंग पॉइंट ठरली 18वी ओव्हर!
३ ओव्हरमध्ये ३० धावा हव्या असताना क्रुणाल पांड्या क्रॅम्पने त्रस्त होता. मैदानावर उभं राहणंही कठीण झालं होतं… पण त्याने मैदान सोडलं नाही.
गझनफरच्या ओव्हरमध्ये दुसऱ्याच चेंडूवर मोठा गोंधळ झाला. नमन धीरने सीमारेषेजवळ झेल पकडून चेंडू तिलक वर्माकडे टोलवला… पण तिलकने झेल पूर्ण केला नाही. एक धाव वाया गेली आणि सामना आणखी ताणला गेला.
यानंतर क्रुणालने जखमी अवस्थेत सलग दोन प्रचंड षटकार ठोकले. विशेषतः पाचव्या चेंडूवर गुडघ्यावर बसून मारलेला सिक्स सामना पूर्णपणे पलटवून गेला.
अखेरच्या चेंडूवर तिलक वर्माने अप्रतिम झेल घेत क्रुणालला बाद केले, पण तोपर्यंत मुंबईच्या हातातून सामना निसटला होता.
क्रुणाल पांड्याच्या ७३ धावांच्या जिद्दी खेळीने आरसीबीला थरारक विजय मिळवून दिला आणि मुंबईचा आयपीएल प्रवास संपला.
