पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये चार वर्षांपूर्वी घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात शिवाजीनगर सत्र न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.
या प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने थेट दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
2021 मध्ये एका तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आला होता. इतकंच नाही तर तिचा अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल करत वारंवार सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या घटनेमुळे संपूर्ण पुणे हादरलं होतं.
घटना उघडकीस येताच देहूरोड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली. वैद्यकीय पुरावे, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे न्यायालयाने चारही आरोपींना दोषी ठरवलं.
नोमान उर्फ अरबाज खान, सुलतान उर्फ मुश्ताख सय्यद, रियाज उर्फ मन्नन खान आणि सोहेल पिरझादे या आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांसाठी हा निकाल मोठा इशारा मानला जात असून नागरिकांकडून या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे.
