पुणे विमानतळ वापरणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलचे काम पूर्ण झाले असले तरी ते सुरू होण्यासाठी आता ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सुमारे २४ कोटी रुपये खर्च करून जुन्या टर्मिनलचा विकास केला आहे. अभियांत्रिकी आणि विद्युत कामे पूर्ण झाली आहेत, मात्र सुरक्षेसाठी लागणारी महत्त्वाची उपकरणे अद्याप दाखल झालेली नाहीत.
मे अखेरीस ही उपकरणे बसवण्यात येणार असून त्यानंतर ‘बीकास’कडून सुरक्षा पाहणी केली जाईल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जुलै किंवा ऑगस्टमध्ये हे टर्मिनल प्रवाशांसाठी खुले होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाचं म्हणजे जुनं आणि नवं टर्मिनल आता एकमेकांना जोडण्यात आलं आहे. त्यामुळे प्रवाशांना एका टर्मिनलमधून दुसऱ्यात सहज जाता येणार आहे.
नवीन सुविधांमुळे आता एकाच वेळी ५०० प्रवाशांच्या बसण्याची सोय होणार असून, तासाला तब्बल ३ हजार प्रवासी हाताळण्याची क्षमता वाढली आहे.
