पुणे

NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधार पुण्यातून अटकेत!

देशभरात खळबळ उडवणाऱ्या NEET पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे.
या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णी याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.
कुलकर्णी हा मूळचा लातूरचा रहिवासी असून, तो NTA च्या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित रसायनशास्त्र विषयाचा व्याख्याता होता.
सीबीआयच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एप्रिल महिन्यात पुण्यात गुप्त शिकवणी वर्ग घेऊन निवडक विद्यार्थ्यांना परीक्षेतील प्रश्न, पर्याय आणि अचूक उत्तरे आधीच सांगण्यात आली होती.
विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी वहीत लिहून घेतलेले प्रश्न प्रत्यक्ष NEET परीक्षेतील रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळल्याचं उघड झालं आहे.
या रॅकेटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळले जात होते.
सीबीआयने देशभरात छापेमारी करत अनेक डिजिटल पुरावे, मोबाईल आणि कागदपत्रे जप्त केली आहेत.
आतापर्यंत ७ आरोपींना अटक झाली असून, या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.