पुणे

भाजप आणखी 20 वर्षं सत्तेत? प्रदीप गुप्तांची मोठी भविष्यवाणी!

देशात भाजपचं वर्चस्व अजून किती वर्षं टिकणार? यावर प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक आणि ‘माय ॲक्सिस इंडिया’चे प्रमुख Pradeep Gupta यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत प्रदीप गुप्ता म्हणाले की, २०१४ पासून सुरू झालेला भाजपचा राजकीय सुवर्णकाळ किमान २० वर्षं टिकू शकतो. म्हणजेच, पुढील अनेक वर्षं भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू भाजपच राहू शकतो, असा त्यांचा दावा आहे.
गुप्ता यांनी याची तुलना स्वातंत्र्यानंतरच्या काँग्रेसच्या काळाशी केली. जसं काँग्रेसने १९७७ पर्यंत देशावर सलग सत्ता गाजवली, तसाच काळ आता भाजपच्या वाट्याला येऊ शकतो, असं ते म्हणाले.
त्यांच्या मते, जोपर्यंत भाजप सरकारची कामगिरी अत्यंत खराब होत नाही, तोपर्यंत जनतेचा पाठिंबा कायम राहू शकतो. दुसरीकडे काँग्रेसला भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या मुद्द्यांमुळे अजूनही नुकसान सहन करावं लागत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, प्रदीप गुप्ता यांच्या या विधानामुळे देशाच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.