पुणे

“पुणे काँग्रेसची भाकरी फिरली! दोन शहराध्यक्षांची घोषणा, पक्षाला नवसंजीवनी ?”

“पुणे काँग्रेसमध्ये अखेर मोठा बदल झाला आहे!
अनेक निवडणुकांतील पराभवानंतर आता काँग्रेसने पुणे शहराची ‘भाकरी फिरवली’ आहे.
काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पुणे शहराध्यक्षपदासाठी एक अनोखा फॉर्म्युला वापरत थेट दोन शहराध्यक्षांची घोषणा केली आहे.
पूर्व पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे माजी महापौर Prashant Jagtap यांच्याकडे… जे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.
तर पश्चिम पुण्याची धुरा सांभाळणार आहेत Dipti Chaudhary.
याशिवाय Pimpri-Chinchwad शहराध्यक्षपदी Narendra Bansode यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मात्र, नुकतेच पक्षात आलेल्या प्रशांत जगताप यांना थेट शहराध्यक्षपद दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजीची कुजबुज सुरू झाली आहे.
निष्ठावान कार्यकर्ते आणि इच्छुक नेत्यांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आता प्रश्न एकच…
हा नवा फॉर्म्युला पुणे काँग्रेसला नवसंजीवनी देणार?
की गटबाजी आणखी वाढवणार?”