महाराष्ट्रातील भेसळखोरांचे आता धाबे दणाणले आहेत! अन्न व औषध प्रशासनाचे नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच धडक कारवाईचा सपाटा लावला आहे.
अवघ्या तीन दिवसांत राज्यभरात तब्बल 53 धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत 34 ठिकाणी बंदी असलेला गुटखा आणि पानमसाला आढळून आला. पोलिसांनी 25 गुन्हे दाखल करत 33 जणांना अटक केली असून 27 आस्थापनांना सील ठोकण्यात आले आहे.
याशिवाय 20 लाखांहून अधिक रुपयांचा गुटखा साठा आणि जवळपास 29 लाख रुपयांचे संशयास्पद खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. मुंबई, पुणे, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात ही मोहीम सुरू असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर प्रशासनाचा कडक बडगा उगारला गेला आहे
तुकाराम मुंढे यांच्या या ‘सिंगम स्टाईल’ कारवाईची राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे.
