हडपसर

मालिकेसाठी फ्लॅट विकला पुरावे देऊ का?बेगडी शिवप्रेम दाखविणारे राजकीय संन्यास घेणार का?डॉ.अमोल कोल्हे यांचे खा.आढळरावांना प्रतिआव्हान…

हडपसर/पुणे (प्रतिनिधी)

विकास कामे सोडून मालिका आणि माझ्या वैयक्तिक बाबतीत पातळी सोडून टीका केली जात आहे मालिकेसाठी फ्लॅट विकला नाही अशा खालच्या पातळीवर जाऊन टीका करताना पत्ता व त्याचे पुरावे जर मी दिले तर बेगडी शिवप्रेम दाखविणारे पोपटपंची तुम्ही राजकीय संन्यास घेणार का असे प्रतिआव्हान शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले.

डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी मालिका बनविताना स्वतःचा फ्लॅट विकला अशी बतावणी करून खोट्या बातम्या पेरल्या व टीआरपी वाढण्यासाठी प्रयत्न केला असा आरोप शिवसेनेचे खासदार आढळराव पाटील यांच्या समर्थकांनी केला या पार्श्वभूमीवर डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी संपर्क साधला असता सहा महिन्यापूर्वी माझे वडील वारले, वडिलोपार्जित संपत्ती वारसाहक्काने मिळाली, माझ्या संपत्तीचे राजकारण विरोधक करीत आहेत मात्र हे तत्वाला धरून नाही, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेसंदर्भात मला बोलायचे नाही परंतु विरोधकांनी टीका केल्याने त्यांना उत्तर द्यावे लागेल जे म्हणत असतील कि मी फ्लॅट विकला नाही त्यांना मी पुरावे देतो आणि सिद्ध झाले तर त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा अशी मागणी करून डॉ. अमोल कोल्हे यांनी विरोधकांच्या खोटेपणाला चाप लावला.
शिरूर लोकसभा मतदारसंघात हडपसर विधानसभा मतदारसंघात प्रचार करत असताना कात्रज मध्ये आपण यांना पाहिलेत का? असे खासदारांचे फ्लेक्स लागले आहेत दहा वर्ष खासदारकी मिळूनही आपणास मतदारांपर्यंत पोहोचता आले नाही आणि आपण आमच्यावर टीका करताहे योग्य नाही हडपसर मतदार संघातील वाहतूककोंडी, पाणी, कचरा, बहुमजली हॉस्पिटल व अनेक प्रश्न प्रलंबित आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आमदार व खासदारांना लाजवेल अशी कामे प्रभागात केली आहेत आणि या कामांच्या जोरावर नागरिक मोठ्या मताधिक्क्याने निवडून देतील असा विश्वास डॉ. कोल्हे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
डॉ. कोल्हे यांनी मालिकेसाठी फ्लॅट विकला नाही त्यांची संपत्ती त्यांनी उमेदवारी अर्ज दाखवली आहे असा खोटा प्रचार करून विखारी प्रचार करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या विरोधकांनी केला मात्र डॉ. कोल्हे यांनी विरोधकांना आव्हान देऊन तुम्हाला पुरावे दिले तर पोपटपंची करणारे राजकीय संन्यास घेणार का? असा टोला लगावल्याने शिवसेनेचे खासदार व त्यांचे समर्थक तोंडघशी पडले आहेत
कात्रज कोंढवा बरोबरच हडपसर परिसरातील प्रभाग क्रमांक 23 व मांजरी परिसरात डॉ. कोल्हे यांनी प्रचार केला भरपूर प्रतिसाद त्यांना लाभला जागोजागी नागरिकांनी गर्दी केली होती
प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन तुपे नगरसेवक, योगेश ससाणे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, विजय मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते.

0 0 votes
Article Rating
157 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments