हे राम…! जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना मारहाण,स्टेजवर आमदार,जिल्हाध्यक्ष यांची जबरी हाणामारी
जळगाव (रोखठोक महाराष्ट्र न्यूजलाईन)- अमळनेर येथील सेना-भाजप मेळाव्या -मध्ये जोरदार राडा झाला असून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना यावेळी मारहाण करण्यात आली. त्याचबरोबर भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांच्यातही हाणामारी झाली. पण अद्याप या मारहाणीमागील नेमके कारण हे समोर येऊ शकलेले नाही.
दरम्यान, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या वाहनांचा ताफा भाजप – शिवसेना युतीच्या मेळाव्यासाठी अमळनेर येथे येत असताना पाडळसरे धरण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रोखला. बुधवारी सायंकाळी ५..४५ वाजेच्या सुमारास हा प्रकार अमळनेरच्या प्रवेशद्वाराजवळ घडला.
कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची पाडळसरे धरण पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी होती. अमळनेरात महाजन यांच्या वाहनांचा ताफा शिरताच तिथे हातात झेंडे घेऊन उभ्या असलेल्या पदाधिका-यांनी पुढे येऊन तो रोखला. गिरीश महाजन हे वाहने थांबताच खाली उतरले आणि या समितीच्या पदाधिका-यांशी त्यांनी चर्चा केली. पाडळसरे धरणासाठी अडीच हजार कोटी रुपये देण्यात आले असल्याचे महाजन यांनी सांगितले. यानंतर त्यांच्या वाहनाचा ताफा मेळाव्याच्या ठिकाणी रवाना झाला.यानंतर मेळाव्यात हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
