पुणे

श्रीराम मंदिरात चोरीची घटना…. मूर्तीच्या पायातील चांदीचे चाळ चोरीला सीसीटीव्ही फुटेजवरून तपास सुरू

(महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
पुण्यातील तुळशीबागेतील श्रीराम मंदिरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आहे. या घटनेत मंदिरातील श्रीराम आणि लक्ष्मण या दोन मूर्तीच्या पायातील चांदीचे चाळ तसेच पुजाऱ्याचा मोबाईल चोरीला गेला.

याबाबत विश्रामबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि.1) सकाळी सातच्या सुमारास मंदिराचे पुजारी संकेत मेहेंदळे नेहमीप्रमाणे मंदिरात आले. पूजा करण्यासाठी मंदिरात परिसरात असलेल्या नळावर पाणी आणण्यासाठी गेले असता एका अंदाजे 25 वर्षीय तरुण मंदिराच्या गाभाऱ्यात शिरला.

या तरूणाने श्रीराम आणि लक्ष्मणाच्या पायातील चांदीचे चाळ चोरून नेले. या दोन्ही दागिन्यांचे वजन प्रत्येकी 150 ग्रॅम असून एकूण 11 हजार 400 रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले. तसेच पुजार्‍याचा मोबाईल देखील चोरून नेला. मंदिर परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातुन विश्रामबाग पोलीस पुढील तपास करीत आहेत.

0 0 votes
Article Rating
190 Comments
Oldest
Newest Most Voted