नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा बलाढ्य भा.ज.पा.ला टक्कर देण्यासाठी मैदानात उभे ठाकलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरू शकले नाहीत. अर्ज भरण्यासाठी काढलेल्या रोड शो दरम्यान उसळलेल्या गर्दीमुळं त्यांना वेळेत निवडणूक कार्यालयात पोहोचताच आलं नाही. त्यामुळं आता ते उद्या अर्ज दाखल करणार आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केजरीवाल दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास निघाले होते. वाल्मिकी मंदिर ते पटेल चौक असा रोड शो काढून मतदारांचं अभिवादन स्वीकारत ते चालले होते. रोड शो दरम्यान त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. केजरीवाल ठिकठिकाणी लोकांना संबोधित करत होते. भेटत होते. समर्थकांच्या गर्दीतून वाट काढताना त्यांना बराच उशीर झाला. निवडणूक कार्यालयात आपण वेळेत पोहोचू शकणार नाही, हे लक्षात येताच त्यांनी मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वत: तसं जाहीर केलं.मोठ्या संख्येनं पाठीराखे व लोक मला भेटायला येत होते. त्यांना डावलून पुढं जाऊ शकत नव्हतो. त्यामुळं उद्या अर्ज दाखल करण्याचं ठरवलं आहे,’ असं त्यांनी सांगितलं. विधानसभेच्या ७० मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे.
केजरीवाल गर्दीत अडकले उमेदवारी अर्जच भरू शकले नाहीत…..
January 21, 20200

Related tags :
# #amit shah #arun jetali #chandrakant patil #devendra fadanvis #nirmal sitaraman #nitin gadkti #nrendra modi #piush goyal #rajnath #ram kadam #ramesh prabhu #shahnaj husen #smirti irani #sushma swaraj #vinod tavde
Related Articles
February 16, 201932
लोकसभा निवडणुकीत भारतात जातीय हिंसाचाराची शक्यता.! पाकच्या षडयंत्राचा अमेरिकेत खुलासा
दिल्ली (न्यूजलाईन)
अमेरिकेतील नॅशनल इंटेलिजेन्सचे संचालक डॅन कोट्स यांनी
Read More
November 3, 20220
उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी बाबत समितीचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर
दिल्ली : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या संदर्भात बुधवारी दिल्ली येथे उच्च
Read More
May 4, 20191
रोड शो दरम्यान केजरीवाल यांच्या कानशिलात, एका संतप्त तरुणाचे दिल्लीत कृत्य
नवी दिल्ली:(रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
लोकसभा निवडणुकीसाठी रोड शो करत असता
Read More