रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज
हडपसर/पुणे
राज्यातील शेतकर्यांची राज्य सरकारने फसवणूक केली आहे. अवकाळी पाऊस व कर्जमाफीमध्ये शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. तर गेल्या महीनाभरात महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्यानंतरही हे सरकार ढिम्म आहे. सत्तेसाठी चुकीच्या मार्गाने सत्तेवर आलेल्या या सरकारच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे, मात्र भाजपा असा चुकीच्या सरकारला आणि त्यांच्या लोकविरोधी कामांना तीव्र विरोध केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भाजपचे शहर अध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक यांनी दिला.
महाविकास आघाडी या शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. महिलांवर अत्याचार वाढले, निष्कीय शासनाविरुद्ध भारतीय जनता पार्टीच्या हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने गाडीतळ येथे एल्गार आंदोलन करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. त्यावेळी शहराध्यक्ष मुळीक बोलत होते.यावेळी भाजप युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर, हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी, भाजपा संघटन सचिव राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, नगरसेविका रंजना टिळेकर,वृषाली कामठे,मनिषा कदम, स्थायी समिती सदस्या उज्वला जंगले, जिल्हा परिषद सदस्या वंदना कोद्रे, मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच शिवराज घुले, माजी नगरसेविका विजया वाडकर, संदीप लोणकर,डॉ. दादा कोद्रे, सुभाष जंगले, गणेश घुले, महेश ससाणे, आरपीआयच्या शशिकला वाघमारे,नितीन होले,प्रमोद सातव, मनोहर देशमुख, इम्तियाज मोमीन, राजू केकान, अविनाश मगर आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर म्हणाले की शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी व्हावी, शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा. महापोर्टल पुन्हा सुरू करण्यात यावे, एन.आर.सी. सी.ए.ए. कायद्यांची महाराष्ट्रात लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी, जलयुक्त शिवार योजना सुरू ठेवावी. या प्रमुख मागण्यांसाठी भाजपाचे आजचे हे एल्गार आंदोलन सुरू केले आहे.जनता आमच्या सोबत आहे.त्यामुळे सरकार जर अशी चुकीची कामे करून जनतेला त्रास देणार असेल, फसवणूक करत असेल तर आम्ही जनतेसाठी सरकारला धारेवर धरू वारंवार रस्त्यावर उतरून जनतेला न्याय मिळवून देवू त्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. प्रास्ताविक भाजपचे मतदार संघाचे अध्यक्ष संदीप दळवी यांनी केले, तर भूषण तुपे यांनी आभार मानले.
What’s up to every , as I am actually keen of reading this website’s post to be updated regularly.
It consists of good material.