मंबई उपनगर

दुर्दैवी ! गेल्या ३ महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने वकिलाची आत्महत्या

मुंबई :  – कोरोना विषाणूमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व कामकाज ठप्प झाले आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अश्यातच तीन महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने आर्थिक विवेचनातून एका वकिलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. उमेश खंडागळे (३७) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आकस्मित गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेशाने वकील असणारे उमेश उल्हासनगर कॅम्प नं-१ जुना बस स्टॉप येथील एका इमारतीत आपल्या कुटुंबासह राहत होते. कोरोनाच्या विषामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील कनिष्ठ न्यायालय बंद आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या वकील उमेश खंडागळे यांनी शुक्रवारी सकाळी नऊ वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश कदम यांनी सांगितले कि, या प्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व ३ वर्षाची मुलगी आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून वकील संघटनेने या प्रकरणी दु:ख व्यक्त केले आहे.
0 0 votes
Article Rating
129 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments