महाराष्ट्र

भीषण अपघात : भाजपाच्या माजी आमदाराच्या मुलाचा परभणीत मृत्यू

भाजपाचे माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा परभणीत शुक्रवारी अपघाती मृत्यू झाला आहे. परभणी शहरातील उड्डाणपुलावर मोहन फड यांचा मुलगा पृथ्वीराज फड याच्या दुचाकीचा अपघातात झाला. अपघातानंतर पृथ्वीराजला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पृथ्वीराज याच्या मृत्यूमुळे फड यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

माजी आमदार मोहन फड यांचा मुलगा पृथ्वीराज फड मुंबईमध्ये शिक्षण घेत होता. राज्यात कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर झाला आहे. त्यामुळे पृथ्वीराज मुंबईहून परभणीला आला होता. शुक्रवारी संध्याकाळी तो आपल्या डुकाटी स्क्रम्बलर (ducati scrambler) बाइकवरून गंगाखेड रस्त्याच्या दिशेनं जात होता. त्यावेळी उड्डाणपुलावर दुचाकीचा अपघात झाला. या अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.

पृथ्वीराजची दुचाकीचा पुढील बाजूने पूर्णपणे चकनाचुर झाला आहे. हा एवढा गंभीर अपघात नेमका कुठल्या वाहनाबरोबर झाला हे मात्र कुणालाही कळु शकले नाही. कारण घटनास्थळी केवळ दुचाकींच पडलेली होती. त्यामुळे त्या वाहनाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1 month ago

casino games, while at the same time offering users chance of short-term winnings,
which in some situations maybe significant.

Comment here

1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x