कोरोणा महामारीच्या संकटकाळात जगरहाटगी चालू ठेवण्यासाठी सर्वांचीच धडपड चालू आहे. शासन ही सर्वतोपरी सर्व बाजूंनी प्रयत्न करत आहे. शासन सुचवित असलेले काही निर्बंध राखून ह्या अदृष्य शत्रु चा मुकाबला करण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे. ह्याच कर्तव्य भावनेतून लोककल्याण प्रतिष्ठान ह्या काळातही शासकीय नियम, निर्बंध पाळून कार्यरत राहुन आपली सामाजिक सेवाभावी वृत्ती जोपासत आहे. असे प्रतिपादन लोककल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजाभाऊ होले यांनी केले. फुरसुंगी येथिल पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तीस संपुर्ण मेडिकल पी.पी.ई.कीट डाॅ. अरविंद कोकाटे यांना लोककल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजाभाऊ होले यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी बोलताना डाॅ.कोकाटे म्हणाले कोरोणा संसर्गजन्य काळात वैद्यकीय सेवा देतांना सुरक्षिततेच्या दृष्टीने मेडिकल पी.पी.ई. कीट ची अतिआवश्यकता आहे. प्रतिष्ठान ने हे जाणून आमच्या सुरक्षिततेची काळजी घेतली आहे, यामुळे वैद्यकीय सेवेस आम्हाला ही अधिक ऊर्जा व उमेद मिळाली आहे. फुरसुंगी गांवचे तलाठी गणेश सुतार यांनी शासन प्रतिनिधी या नात्याने शासनातर्फे या कार्यासाठी आभार मानत असल्याचे नमुद केले. याप्रसंगी प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष हरिश्चंद कुळकर्णी, कार्यकारिणी सदस्य प्रा.एस.टी.पवार, राजु सावळगी, प्रभाकर शिंदे, चंद्रकांत वाघमारे, किरण माटे, संदेश राजीवडे, लक्ष्मण कोल्हे, जनार्दन चव्हाण, तलाठी आॅफिस मधिल कोतवाल सुरेश तांगडे, फुरसुंगी आरोग्य केंद्रातील कर्मचारी सोशलडिस्टक्सींन पाळुन उपस्थित होते. तसेच याप्रसंगी उपस्थितांना प्रतिष्ठान तर्फे मास्कचे वाटपही करण्यात आले.
मदत नव्हे कर्तव्य : लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीने पीपीई किट वाटप
July 11, 20201

Related Articles
May 21, 20250
“रस्ते जलमय होताच रस्त्यावर केलं अनोखं आंदोलन, शरद पवारांच्या कार्यकर्त्याने रस्त्यावर पाण्यात चालविली बोट..!
पुणेकरांची कालच्या पावसाने चांगलीच दाणादाण उडाली. मोठ्या प्रमाणात वाहतूक
Read More
March 1, 20240
साहित्य सम्राटचे लोहिया उद्यानात कविसंमेलन संपन्न
चांगली कविता कागदावर असेल आणि सादरीकरण योग्य नसेल तर आपणच आपली कविता मारतो
Read More
May 12, 20210
“लस घेण्यासाठी नागरिकांना करावी लागते वणवण” लसीकरण केंद्रावर सुसूत्रता आणावी – सुधीर मेथेकर
हडपसर / पुणे (प्रतिनिधी)
सध्या कोरोनाचे संकटाने सर्व हवालदिल झाले आहेत. यावर
Read More
discord counter strike