पुणे

राष्ट्रीय पाटील तालीम संघाचे संस्थापक दत्तात्रय तुपे यांचे निधन

हडपसर / पुणे (प्रतिनिधी)
राष्ट्रीय पाटील तालीम संघाचे अध्यक्ष उल्हास तुपे यांचे वडील दत्तात्रय अण्णा तुपे वय यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे.
हडपसर चे आमदार चेतन तुपे, प्रवीण तुपे, नगरसेवक योगेश ससाणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने अंत्यविधीप्रसंगी उपस्थित होते.
हडपसर औद्योगिक वसाहत मधील स्पायका कंपनीत नोकरी करत असताना कामगार नेते म्हणून त्यांनी अनेक कामगारांना न्याय मिळवून दिला. त्यांना व्यायामाची आवड असल्याने त्यांनी राष्ट्रीय पाटील तालीम संघाची स्थापना केली, या तालमीच्या माध्यमातून अनेक पैलवान घडविले. हडपसर मधील
शांतिदुत मित्र मंडळाची स्थापना त्यांनी केली.
माजी स्वीकृत नगरसेवक उल्हास तुपे, प्रमोद तुपे यांचे ते वडील होत.

0 0 votes
Article Rating
1.4K Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments