पुणे

Pune News | पुण्यातील 2 महसुल अधिकार्‍यांकडे ED ची चौकशी; बिल्डर अविनाश भोसले, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ

पुणे : माजी महसुलमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुरुवारी ८ तास चौकशी करीत असतानाच पुण्यातील २ महसुल अधिकार्‍यांकडेही या प्रकरणात चौकशी केली जात होती. त्यामुळे उद्योजक अविनाश भोसले आणि एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Pune News | builder avinash bhosale and eknath khadse are in trouble due to ed enquiry

भोसरी औद्योगिक वसाहतीतील भुखंड प्रकरणी ईडीने एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली आहे. त्यापाठोपाठ गुरुवारी एकनाथ खडसे यांची सुमारे ८ तास चौकशी केली. त्याचवेळी पुण्यातील २ महसुल अधिकार्‍यांना ईडीने मुंबईला बोलावून घेतले होते. एकनाथ खडसे हे महसुलमंत्री असताना त्यांनी काढलेल्या या जमिनीबाबतच्या ऑर्डरची माहिती या अधिकार्‍यांकडून घेण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच खडसे यांनी अविनाश भोसले यांच्या जमिनीबाबत काढलेल्या ऑर्डरचीही या अधिकार्‍यांकडे चौकशी करण्यात आली.

मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी एकनाथ खडसे आणि अविनाश भोसले यांच्याकडे यापूर्वी चौकशी केली आहे. अविनाश भोसले यांची जवळपास ४० कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. त्यात या महसुल अधिकार्‍यांकडून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यात काही अनियमितता आढळून आल्यास ते दोघांच्या दृष्टीने अडचणीचे ठरणार आहे. एकनाथ खडसे यांची काल चौकशी पूर्ण करताना यापुढेही जेव्हा जेव्हा गरज भासेल, तेव्हा चौकशीचे समन्स बजावले जाईल, असे ईडीच्या अधिकार्‍यांनी खडसे यांना आवर्जुन सांगितले. त्यावरुन त्यांची ही चौकशी संपलेली नसून यापुढेही चौकशी चालू राहण्याची शक्यता अधिकार्‍यांनी स्पष्ट केली आहे. तसेच या प्रकरणात अटकेत असलेले खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्याकडून कोठडीच्या मुदतीत मिळालेल्या नव्या माहितीच्या आधारे खडसे यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x