पुणे

लोणी कंद येथे पूर्ववैमनस्यातून बाप लेकाचा कोयत्याने व दगडाने ठेचून खून

प्रतिनीधी: स्वप्नील कदम

पुणे:पूर्ववैमनस्यातून टोळक्याने बाप- लेकावर धारदार हत्याराने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास लोणीकंदमध्ये घडली. याप्रकरणी लोणींकद पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

सनी कुमार शिंदे (वय २२) आणि कुमार मारूती शिंदे (वय ५५, दोघेही रा. शिंदे वस्ती, लोणीकंद) असे खून झालेल्या बापलेकांची नावे आहेत.

लोणीकंद पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात सचिन शिंदे या तरुणाचा खून केल्याप्रकरणी सनी शिंदे याच्यावर गुन्हा दाखल होता. संबंधित गुन्ह्यात तो तीन महिन्यांपूर्वी जामीनावर बाहेर आला होता. बुधवारी रात्री सातच्या सुमारास सनी आणि त्याचे वडील मोटारमधून लोणीकंदमधून शिंदे वस्तीकडे निघाले होते. त्यावेळी दुुसऱ्या मोटारीतून आलेल्या तोळक्याने सनी वर धारदार शस्त्रांनी वार सुरू केले. यावेळी त्याला वाचविण्यासाठी वडील कुमार शिंदे मध्ये आले. त्यावेळी टोळक्याने त्यांच्यावरही वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर टोळके पसार झाले आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.