पुणेहवेली

गुन्हे शाखा युनिट ६, ची उल्लेखनीय कामगिरी सराईत गुन्हेगारा कडून चोरीची ९ दुचाकी वाहने केली जप्त

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

पुणे शहरामध्ये दुचाकी वाहन चोरीला आळा बसावा, याकरिता मोहिम राबवून कारवाई करण्याचे आदेश मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी आदेश दिल्याने त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-६पुणे शहर कडील पथक हद्दीत गस्त करीत असताना, पोलीस अमलदार यांना बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरिल गुन्हेगार समाधान जगताप, रा यवत पुणे यांचेकडे नंबर नसलेली मोटार सायकल असुन ती चोरीची आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली.

मिळालेल्या बातमीप्रमाणे मांजरी स्मशान भुमीजवळ मांजरी खुर्द, ता हवेली, जि. पुणे येथे सापळा रचुन समाधान गणपत जगताप, वय २८ वर्षे, रा. गाडगीळ वस्ती, यवत, ता. दौंड, जि. पुणे यास शिताफीने ताब्यात घेतले व त्याच्या जवळील नंबर नसलेल्या दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याचे ताब्यातील मोटरसायकल बाबत माहिती घेतली असता यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामिण येथे गुन्हा दाखल असल्याने त्याचे ताब्यातील मोटार सायकल जप्त करण्यात आली. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने लोणीकंद पोलीस स्टेशन कडील गु.र.नं.३६१ / २०२२. भा. दं. वि. कलम ३७९ हा वाहन चोरीचा गुन्हा केल्याची खात्री झाल्याने त्यास

रिमांड घेण्यात आले आहे. रिमांड दरम्यान आरोपीने ८ वाहने चोरी केल्याची कबुली दिल्याने ती पंचनाम्याने जप्त करण्यात आली आहे.

अशा प्रकारे पुणे शहर व परिसरातील कोथरुड, चंदननगर, लोणीकंद, लोणी काळभोर, कोंढवा, अलंकार, हडपसर, तळेगाव दाभाडे व यवत या पोलीस स्टेशनचे एकूण ९ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणून एकूण ४,५०,०००/- रुपये किंमतीची वाहने जप्त करण्यात आली आहेत. पुढील तपास युनिट ६ मार्फत करीत आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही गुन्हे शाखा युनिट ६- चे पोलीस निरीक्षक, श्री. गणेश माने, सहा पोलीस निरीक्षक, नरेंद्र पाटील, पोलीस उप-निरीक्षक, भैरवनाथ शेळके, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहिगुडे, नितीन शिंदे, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, सचिन पवार, नितीन धाडगे, सुहास तांबेकर व ज्योती काळे यांनी केली आहे.