भाजपच्या “या”माजी आमदारांची “फॅमिली” कोरोना पॉझिटिव्ह : आपण सर्वांनी काळजी घ्यावी – योगेश टिळेकर

Rokhthok Maharashtra 1 51

पुणे : कोरोनाने जगभर थैमान घातलं आहे. पुण्यात देखील दिवसेंदिवस कोरोंच्या रुग्णात कमालीची वाढ होत आहे. काल महापौर तर आज भाजपचे हडपसर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार योगेश टिळेकर व त्यांची पत्नी आणि यशराज व विराज ही दोन्ही मुले आणि भाऊ चेतन हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. तसेच त्यांची आई नगरसेविका रंजना टिळेकर, भावाची पत्नी 
आणि दोन्ही मुलांचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत. योगेश टिळेकर व दोन्ही मुले व भाऊ यांची प्रकृती स्थिर असून सध्या त्यांच्यावर बिबवेवाडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
भाजपाच्या नुकत्याच जाहिर करण्यात आलेल्या प्रदेश कार्यकारिणीत टिळेकर यांना ओबीसी आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. 
“दोन दिवसापूर्वी ताप आणि कणकण आल्याने माझी कोविड तपासणी करुन घेतली असता तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला. माझी प्रकृती स्थिर आहे. तुमच्या आशिर्वादामुळे लवकरच बरा होऊन येईन. आपण सर्वांनी काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे.” असे आवाहन टिळेकर यांनी केले आहे.
दरम्यान, हडपसर-मुंढवा सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत शनिवारी नव्याने ५३ रूग्ण आढळून आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून रोज नव्याने रूग्णांची संख्या वाढत आहे. संचारबंदीमध्ये शिथिलता आणल्यामुळे नागरिक मोठया संख्येने घराबाहेर पडत आहेत. तसेच अनेक ठिकाणी गर्दी होत आहे. त्यामुळेच रूग्णांची संख्या रोज वाढत असल्याचे वैदयकीय तज्ञांचे मत आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच मास्क वापरणे, गर्दी न करणे या गोष्टींकडे लक्ष देवून स्वतःची काळजी घ्यावी असे अवाहन ममहापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. 

0 0 votes
Article Rating
51 Comments
Oldest
Newest Most Voted

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.