शिरूरमध्ये चोरट्याचा गोळीबार! मुलगी-वडिलांचा प्रतिकार, रहिवासी जखमी
पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. रामलिंग रोडवरील आनंद सोसायटीमध्ये चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्याने गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीमध्ये आलेल्या चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न स्थानिक रहिवाशांनी केला. यावेळी एका मुलीने आणि तिच्या वडिलांनीही चोरट्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिकार होत असल्याचे पाहून चोरट्याने प्रत्युत्तरादाखल गोळीबार केल्याचे समजते.
या गोळीबारात एका रहिवाशाच्या पायाला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर आनंद सोसायटीसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणात नेमकी किती जणांची उपस्थिती होती, आरोपी कोण आहे आणि पोलिसांनी पुढे काय कारवाई केली, याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
शिरूरमधील या घटनेच्या पुढील अपडेट्ससाठी पाहत राहा रोखठोक महाराष्ट्र!





