नाशिकहून नाणीजधामकडे ‘वसुंधरा पायी दिंडी’! पर्यावरण संवर्धनाचा जागर

Rokhthok Maharashtra 4 0

पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि मानवसेवेचा संदेश देणारी ‘वसुंधरा पायी दिंडी २०२६’ सध्या चर्चेत आहे. रामानंद संप्रदायाच्या वतीने सुरू झालेली ही दिंडी नाशिकहून रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नाणीजधामच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. या दिंडीत हजारो भाविक सहभागी झाले आहेत.
या उपक्रमातून वृक्षसंवर्धन, स्वच्छता, जागतिक तापमानवाढीबाबत जनजागृती आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला जात आहे. दिंडीच्या मार्गावर वृक्षारोपणासोबतच स्वच्छता राखण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे. भाविकांसाठी पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांसारख्या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. भाविकांच्या व्यवस्थापनासाठी ॲप आणि क्यूआर कोड प्रणालीचा वापर केला जात आहे.
तसेच, जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या हस्ते ‘ब्लड इन नीड’ या ॲपचे लोकार्पण करण्यात आले आहे. या माध्यमातून गरजू रुग्णांना रक्तदाते शोधणे अधिक सुलभ होणार आहे.
येत्या २१ ऑक्टोबर रोजी जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे या दिंडीचा समारोप होणार आहे.
अध्यात्मासोबत पर्यावरण संवर्धन आणि समाजसेवेचा वसा जपणारी ही दिंडी एक सकारात्मक संदेश देत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.