देशाचा गौरव वाढवण्यासाठी युवकांनी कार्य करावे. चेतन (दादा) तुपे पाटील- आमदार हडपसर विधानसभा मतदारसंघ

Rokhthok Maharashtra 1 0

हडपसर , संविधानानुसार राज्यकारभार चालणारा भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. आपण सर्व भारतीय नागरिकांनी भारतीय राज्यघटनेचे पालन करून स्वातंत्र्य व देशाची सार्वभौमता अबाधित राखण्याचा प्रयत्न करावा. असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय चेअरमन आमदार चेतन दादा तुपे पाटील यांनी केले.साधना विद्यालयात आयोजित प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत,ध्वजगीत व महाराष्ट्र राज्यगीत सादर करण्यात आले. यानंतर ध्वजास व पाहुण्यांना एन.सी.सी.,आर.एस.पी.व स्काऊट छात्रांनी मानवंदना दिली.

 

याप्रसंगी संस्थेचे जनरल बाॅडी सदस्य दिलीप आबा तुपे ,अरविंद भाऊ तुपे,आयर्नमॅन,ज्येष्ठ उद्योजक दशरथ जाधव, एस.एम.जोशी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.किशोर काकडे ,साधना विद्यालय व आर.आर शिंदे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव ,
इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुशीर,मुख्याध्यापिका लक्ष्मी आहेर,उपमुख्याध्यापिका योजना निकम,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते , माधुरी राऊत ,आजीव सभासद लालासाहेब खलाटे,आजीव सेवक अनिल मेमाणे,ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख पांडूरंग गाडेकर ,विजय सोनवणे,धनाजी सावंत ,बालवाडी विभागप्रमुख इताले ताई,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.व शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.तर ध्वजसंचलन R.S.P जिल्हा समादेशक रमेश महाडीक यांनी केले.कार्यक्रमाचे निवेदन अनिल वाव्हळ व प्रतापराव गायकवाड यांनी केले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.