मांजरी बुद्रूक मधील धक्कादायक घटना, 7 वर्षाच्या पुतणी वर अत्याचार नराधमाला पोलीसांनी ठोकल्या बेड्या…

Rokhthok Maharashtra 1 0

प्रतिनीधी: स्वप्नील कदम

पुणे: एका 22 वर्षीय तरुणाने आपल्याच 7 वर्षाच्या पुतणीवर गेल्या 6 महिन्यापासून लेंगिक छळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मांजरीतील एका सोसायटीतील जून ते 6 डिसेंबर 2021 दरम्यान वारंवार हा प्रकार घडला आहे.या प्रकरणी एका 28 वर्षाच्या महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे .यावरून पोलिसांनी मांजरीतील 22वर्षाच्या तरुणाला अटक केली आहे.

हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 7 वर्षाच्या मुलीला त्यांचा दीर असलेल्या आरोपीने लाडीगोडी लावली. तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यासोबत गेल्या 6 महिन्यापासून जबरदस्तीने लैंगिक संबंध केले. हा प्रकार कोणाला सांगितलं तर तुझ्या बापाला जीवे ठार मारीत अशी धमकी दिली .त्यामुळे हा प्रकार तिने कोणालाही सांगितला नव्हता .मात्र ,तिला त्रास होऊ लागल्याने तिने आईला सांगितले .त्यानंतर त्यांनी हडपसर पोलिसांकडे धाव घेतली .पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गोसावी अधिक तपास करीत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.