नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या ,दौंड मधील गिरिम येथील धक्कादायक घटना

Rokhthok Maharashtra 1 0

प्रतिनिधी: स्वप्नील कदम

दौंड: सासरच्या छळाला कंटाळून अवघ्या पाच महिन्यापूर्वी केलेल्या विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गिरीम (ता. दौंड) येथे शनिवारी  ही दुर्दैवी घटना घडली आहे . याप्रकरणी सासरच्या चौघांवर दौंड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

पूर्वा जीवन कोळपे (वय 19 रा. मदने वस्ती,गिरिम, ता. दौंड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे .आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती जीवन माणिक कोळपे (वय 25) , सासरा माणिक ऊर्फ जयसींग राजाराम कोळपे, सासू लता माणिक कोळपे, दीर मनोज माणिक कोळपे ( सर्व रा. मदने वस्ती, गिरीम, ता. दौंड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यात पती सासु सासरा तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी मृत विवाहितेचे वडिल विश्वनाथ दादा फुलारी ( रा . जाधव वाडी, गीरीम ) यांनी दौंड पोलिसात फिर्याद दिली आहे.

दौंड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार , सन 2019 मध्ये जीवन कोळपे याने पूर्वाला पळवुन नेल्याप्रकर्णी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पूर्वा सज्ञान झाल्या नंतर 5 महिन्यापूर्वी पूर्वा फुलारी व जीवन कोळपे यांनी प्रेम विवाह केला होता. परंतु 11 डिसेंबर रोजी पूर्वाने मदने वस्ती येथे राहत्या घरी गळफास लावून घेतला.या प्रकरणी पूर्वाचे वडील विश्वनाथ दादा फुलारी (रा. जाधव वाडी, गिरिंम) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पूर्वाचा मानसिक व शारीरिक छळ करून दोन वर्षां पूर्वी दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी वडिलांना सांगण्यासाठी दबाव टाकत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे तपास करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.