दौंड तालुक्यात बोगस सर्टिफिकेट वापरून बारावी परीक्षा हुशार लेखनिक देतात “ढ” विद्यार्थांचे पेपर : बोगस सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टरवर कारवाईची मागणी

Rokhthok Maharashtra 24 181

दौंड (रोखठोक महाराष्ट्र न्युज)
दौंड तालुक्यातील मौजे वरवंड येथील माध्यमिक विद्यालयात तिन विद्यार्थ्यांनच्या हाताला बोगस पलास्टर करून बसविले लेखनिक माहिती सेवाभावी संस्थेने केला पर्दाफाश यामध्ये डॉक्टरने बोगस सर्टिफिकेट दिले असून शिक्षण खात्यातील त्रुटींचा फायदा विद्यार्थी व पालक घेत आहेत. यासंदर्भात शिक्षण खात्याकडे तक्रार दाखल झाली असून चौकशी सुरू आहे.
दौंड तालुक्यातील मौजे वरवंड या ठिकाणी कला शाखेचे दोन विद्यार्थी त्याची नावे डुबे, जहागिरदार, विज्ञान शाखेचा एक विद्यार्थी त्याचे नाव मारकड असे आहे.
कानगावचे प्राचार्य मारकड यांचा मुलगा आहे शिक्षकानेच आपल्या मुलांना कायद्याच्या त्रुटींचा लाभ घेतले शिक्षण खात्याला फसविण्याचे काम केले आहे.
या बोगस प्लास्टर केलेल्या विद्यार्थ्यांबाबत या विषयावर माहिती सेवाभावी संस्थेच्या वतीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यापर्यंत पत्रव्यवहार द्वारे पोहोचवली आहे.
या विद्यार्थ्यांचे मेडिकल करावे याकरिता संबंधित गटशिक्षणअधिकारी, केंद्र संचालक, शिक्षण अधिकारी माध्यमिक पुणे, बोर्डाच्या विभागीय सचिव पुणे हे जबाबदार आहे यांनी या विद्यार्थ्यांनचे लेखनिक त्वरीत हटवावा अशी मागणी दौंड तालुक्यातुन होत आहे.
खोटे सर्टिफिकेट दिल्या संदर्भात चौफुला केडगाव येथील डॉ.शंकर चव्हाण यांना संपर्क साधला असता मी या शाळेचा विद्यार्थी आहे, सहानुभूती म्हणून मदत करण्याच्या हेतूने सर्टिफिकेट दिले
विद्यार्थी माझ्याकडे आले त्यांनी सांगितले कि माझा हाताचा मधला जाॅईन्ड निघला होता व तेथेच बसविला आहे त्यांनी एक्सरे काढला परंतु कुठेच फ्रॅक्चर दिसून नाही आले तर विद्यार्थी डॉक्टरांना म्हणाले कि माझा हात दुखत आहे याला प्लास्टर करणे गरजेचे आहे परीक्षेसाठी विद्यार्थी मारकड, डबे यांनी बोगस पलास्टर केले.
सरकारी डाॅक्टर आरोग्य केंद्र वरवंड यांनी खाजगी डाॅक्टरच्या सर्टिफिकेटस वर डोळ झाकून सही शिक्का का दिला? असा सवाल सामाजिक संस्थांनी केला आहे.

ही बाब शाळेचे संस्थापक अध्यक्ष, प्राचार्य, यांना सर्व प्रकार माहित असताना देखील यांनी लेखनिक बसविण्यासाठी शाळेची शिफारस का दिली? याबाबत शंका उपस्थित होत आहे.
कानगावचे प्राचार्य मारकड हे शिक्षक आहेत यांच्याच मुलाच्या हाताला बोगस पलास्टर करून १२वीच्या विज्ञान शाखेत लेखनिक बसवित असतील तर हे योग्य आहे का?
या तिन विद्यार्थी यांनी हाताला बोगस पलास्टर केल्याची बाब गटविकास अधिकारी गणेश मोरे, गटशिक्षण अधिकारी श्री. सांगणे, शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री.मोरे यांनी त्वरीत दखल घेवून वरवंड माध्यमिक विद्यालयात प्रशासन पाठविले
दौंड तालुक्यातील वरवंड येथे हा जो प्रकार घडला आहे याला जबाबदार माध्यमिक विद्यालय आहे का? यांच्यावर कारवाई होणार का? बारावीचे बोर्ड रद्द होणार का?वरवंडचे प्राचार्य शेलार यांनी शिफारस का दिली? व कोणाच्या सांगण्यावरून दिली? या शाळेत बोर्डाची परीक्षा केंद्र वरवंड असल्यापासुनच हे गैर प्रकार घडत आहेत का? या विद्यार्थ्यांनच्या हाताला बोगस पलास्टर करून शाळा पास करण्यासाठी लाखो रूपये घेत आहे का? याबाबत पालक ब सेवाभावी संस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
प्राचार्याने आपल्या मुलाला पास करण्यासाठी सर्व यंत्रणा वेठीस धरले शिक्षण संस्था व डॉ.शंकर जाधव यांनी काही पैशांसाठी खोटे सर्टिफिकेट दिले, या सर्वांवर आपल्या पदाचा गैरवापर केल्याबद्दल कारवाई होणार का प्रकरण गुंडाळले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
डॉ.शंकर जाधव यांचे चौफुला येथे भव्य हॉस्पिटल असून त्यांनी खोटे सर्टिफिकेट दिल्याने त्यांचे वैदकीय प्रमाणपत्र रद्द करावे अशी मागणी सामाजिक संस्थांनी केलेली आहे.

0 0 votes
Article Rating
181 Comments
Oldest
Newest Most Voted

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.