दिवाळीची भेट देण्याच्या आमिषाने महिलेच्या मंगळसूत्राची चोरी ; रास्ता पेठेतील घटना…!

Rokhthok Maharashtra 1 0

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : पुण्यातील रास्ता पेठेत दिवाळी भेट देण्याच्या आमिषाने पादचारी महिलेच्या पिशवीतून 92 हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरल्याची घटना रास्ता पेठेतील पाॅवर हाऊस चौकात घडली. दिवाळी भेट देण्याच्या आमिषाने पादचारी महिलेच्या पिशवीतून 92 हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरल्याची घटना रास्ता पेठेतील पाॅवर हाऊस चौकात घडली.

याबाबत एका 52 वर्षीय महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला रविवार पेठेत राहायला आहेत. त्या रास्ता पेठेतील पाॅवर हाऊस चौकातून निघाल्या होत्या. महावितरण कार्यालयापासून काही अंतरावर एका डेअरीजवळ चोरट्यांनी महिलेला अडवले. दिवाळी भेट देण्याचे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. महिलेला बोलण्यात गुंतवून चाेरट्यांनी पिशवीतून 92 हजार रुपयांचे मंगळसूूत्र चोरले. फरार झाले. घरी गेल्यावर सदरील बाब महिलेच्या लक्षात आली. त्यानंतर महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यादव करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.