धक्कादायक : ससूनमध्ये हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधीक्षकाची तडकाफडकी उचलबांगडी सहा महिन्यांत चार अधीक्षकांच्या बदल्या…!

Rokhthok Maharashtra 16 0

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : ससून हॉस्पिटल मध्ये नेमके चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयात सध्या वैद्यकीय अधीक्षक पदासाठी मोठी स्पर्धा चाललेली दिसत आहे. त्यामुळे कधी कोणाची उचलबांगडी होईल काही सांगता येत नाही. सध्याचे विद्यमान अधीक्षक डॉ.किरणकुमार जाधव यांना हटवून आता त्यांच्या जागी डॉ.अजय तावरे यांची तडकाफडकी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे मागील सहा महिन्यांत चौथा अधीक्षक नेमण्याचा विक्रम रुग्णालय प्रशासनाने केला. विशेष म्हणजे अधिष्ठातापदाचा कार्यभार डॉ.विनायक काळे यांनी स्वीकारल्यानंतर महिनाभरातच त्यांनी अधीक्षक बदलण्याचे पाऊल उचलले आहे. विद्यमान अधीक्षक डॉ.किरणकुमार जाधव यांना हटवून आता त्यांच्या जागी डॉ.अजय तावरे यांची तडकाफडकी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

ससूनच्या वैद्यकीय अध्यक्षपदी मे महिन्यात डॉ. यल्लपा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ऑगस्टमध्ये त्यांना हटवून डॉ. सुनील भामरे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर डॉ. भामरे यांच्याजागी सप्टेंबरमध्ये प्रमुख डॉ.किरणकुमार जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. जाधव यांनी रुग्णालयाच्या प्रशासनातील गोंधळ दूर करीत सुसूत्रता आणली होती. याचबरोबर त्यांनी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांसाठी वक्तशीरपणा आणि शिस्तीचे पाऊल उचलले होते. याबद्दलही अनेक जण त्यांच्यावर नाराज होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

डॉ.अजय तावरे हे आधी अधीक्षकपदी होते. मूत्रपिंड प्रत्यारोपण फसवणूक प्रकरणी तावरे यांची मागील वर्षी एप्रिलमध्ये या पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. त्यांची या प्रकरणी विभागीय चौकशीही करण्यात आली होती. याचबरोबर डॉ. तावरे हे न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख आहेत. त्यांच्याकडे एक पूर्णवेळ जबाबदारी असताना वैद्यकीय अधीक्षकपदाची जबाबदारी आता देण्यात आली आहे. एकाच व्यक्तीकडे दोन पूर्णवेळ जबाबदाऱ्या सोपविणे चुकीचे आहे, असेही सूत्रांनी सांगितले.हा तडकाफडकी उचलबांगडीचा खेळ कुठपर्यंत चालणार ससून हॉस्पिटलला एक सक्षम वैद्यकीय अधीक्षक कधी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.