दागिन्याबाबत विचारले म्हणून आईवर वार करणाऱ्या मुलावर गुन्हा वाकड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद ः

Rokhthok Maharashtra 15 0

पुणे, दि. १४ ः घरातील दागिने गहाण ठेवले की विकले, याबाबत जाब विचारल्याने आईवरच चाकूने वार करणाऱ्या पोटच्या दिवच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार ईश्वर बामणे (वय १९, रा. १६ नंबर, थेरगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि त्यांची दोन मुले एकत्र राहतात. ओंकार हा महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ओंकारने दागिने घेतले किंवा कुठे तरी ठेवले, असा आईचा संशय होता. त्यामुळे तिने ओंकारला दागिन्यांबाबत विचारणा केली. ‘तू दागिने विकले की गहाण ठेवले, दागिने कोठे आहेत’ असा जाब विचारून, सांग नाही तर पोलिसांना बोलावीन असे धमकावल्याचा राग आल्याने ओंकारने ‘तू जिवंत राहिलीस तर पोलिसांना बोलावशील’ असे म्हणत घरातील चाकूने आईच्या डोक्यावर व हातावर वार करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. फौजदार पोटे तपास करीत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.