महिला दिनानिमित्त भीमथडी खाद्य महोत्सव ; हिंदू खाटिक महिला संघटना निर्मित अहिल्या व्यासपीठ पुणे चा पुढाकार

Rokhthok Maharashtra 24 5

पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज)
महिला दिनानिमित्त हिंदू खाटिक महिला संघटना निर्मित अहिल्या व्यासपीठ पुणे च्यावतीने भीमथडी खाद्य महोत्सव या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन धनकवडी येथील शरद पवार बहुद्देशीय भवन येथे केले होते.
या कार्यक्रमाचे उदघाटन नगरसेविका अश्विनी भागवत यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात भाग घेण्यासाठी कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, लोणावळा येथून महिला आल्या होत्या. त्यांना पुण्यातील खवय्यां नागरिकांनी खूपच छान प्रतिसाद दिला.
संपूर्ण महाराष्ट्रात हिंदू खाटीक समाजाचा हा पहिलाच खाद्यमहोत्सव अहिल्या व्यासपीठाने आयोजित केला होता. या उपक्रमाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. महिला एकत्रीकरण व आर्थिक स्वावलंबन हाच आमच्या संघटनेचा मुख्य उद्देश आहे. आतापर्यंत या संघटनेच्या माध्यमातून मातृशक्ती पुरस्कार, तेज शलाका सन्मान, अशी अशी सासू, सिंधुताई सपकाळ व्याख्यान , होममिनिस्टर आणि रोटी डे हा एक आगळा वेगळा कार्यक्रम केला आहे. यामध्ये समाजातील भगिनींना आवाहन केले महिलांनी सुमारे ३ हजार चपात्या व पुरेल अशी भाजी दिली व त्यांचे वाटप फूड चेन मार्फत रस्त्यावरील गरीब लोकांमध्ये केले.
माधुरी ताई निकुडे या अहिल्या व्यासपीठाच्या अध्यक्षा असून सरस्वती पवार, राणी कांबळे, सीमा घोणे, अंजना नखाते, रेखा बेंद्रे, दुर्गा कल्याणकर, स्वाती जठार, सुजाता पलंगे या विश्वस्त आहेत.

0 0 votes
Article Rating
5 Comments
Oldest
Newest Most Voted

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.