IAS तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय! आईच्या निधनानंतर कर्मकांडाला फाटा

Rokhthok Maharashtra 1 0

छत्रपती संभाजीनगरमध्ये परंपरेला छेद देणारा एक वेगळा निर्णय समोर आला आहे.

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आपल्या आई आसराबाई मुंढे यांच्या निधनानंतर
पारंपरिक विधींना फाटा दिला आहे.अस्थी विसर्जन नदीत न करता,
त्यांनी आपल्या शेतात वडाचे झाड लावत
पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केलं.

 

या वेळी त्यांनी दहावा, तेरावा किंवा गोड जेवण यांसारख्या
सर्व पारंपरिक कर्मकांडांना नकार दिला.तुकाराम मुंढे म्हणाले,
“निसर्गाचं रक्षण हाच खरा श्रद्धेचा मार्ग आहे.”परंपरेपेक्षा पर्यावरणाचा विचार करणारा हा निर्णय
सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.