*”IMD चा इशारा! महाराष्ट्रात 80km/h वादळ येणार | 4-7 एप्रिल हवामान अपडेट,,,!”*

Rokhthok Maharashtra 1 0

निसर्गाचा इशारा! महाराष्ट्रासह देशभरात वादळाचा धोका वाढला आहे.
India Meteorological Department म्हणजेच IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत वाऱ्याचा वेग ताशी 80 किमीपर्यंत जाणार आहे. 4 ते 7 एप्रिलदरम्यान वादळी पाऊस, गारपीट आणि जोरदार वारे यांचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मध्य भाग, मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जळगाव, बीड, परभणी, अकोला, अमरावती, यवतमाळ अशा अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे.

https://www.instagram.com/rokhthokmaharashtra/reel/DWtFHLeCZ2A/

शेतातील पिकांना मोठा धोका असून, वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत होण्याची भीती आहे.
नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.