एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा जेरबंद

Rokhthok Maharashtra 1 0

हडपसर पोलिसांची कामगिरी ः
पुणे, दि. २८ ः हांडेवाडी रोड येथील एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक केली. विक्रमलाल इंद्रलाल शहा (वय २८, रा. जगताप चौक, रहाटणी रोड, पिंपळे सौदागर, पुणे. मूळ रा. भटगाव, तेहरी गऱ्हाल, उत्तराखंड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

 

पोलिसांनी सांगितले की, नियंत्रण कक्षाकडून हडपसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हांडेवाडी रोड येथे अज्ञात एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पोलिसांना पाहून आरोपीने अंधाराचा फायदा घेत पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी ताबडतोब पाठलाग करून अटक केली. आरोपीकडून लाकडी दांडके आणि टिकाव जप्त केला.

 

अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पंडित रेजितवाड यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार सुनील कांबळे, वैभव भोसले, अतुल पंधरकर, अमित साखरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.