#Rokhthok_Big_Breking_News दिवे घाटातील ६५ फुटी विठ्ठल मूर्तीची पूजा कोरोना संकट दूर होण्यासाठी खा. अमोल कोल्हे यांचे साकडे

Rokhthok Maharashtra 1 153
पुणे – आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज दिवे घाटातील ६५ फुटी विठ्ठल मूर्तीची पूजा करून देशावर आलेले कोरोनाचं संकट लवकर दूर व्हावे यासाठी साकडं घातलं.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा पायी वारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी पंढरपूर येथे जाऊन श्री विठ्ठलाच्या चरणी लीन होण्याऐवजी आज खासदार डॉ. कोल्हे यांनी विजय कोल्हापूरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व सुप्रसिद्ध मूर्तिकार सागर भावसार यांनी घडवलेल्या दिवे घाटातील ६५ फुटी विठ्ठलाचे दर्शन घेतले. या प्रसंगी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे, लीड मिडियाचे विनोद सातव, अमोल हरपळे, गणेश लोणारे आदी उपस्थित होते.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्याला दिवे घाटातील भव्य विठ्ठल मूर्तीचे दर्शन व पूजा करण्याचा योग जुळवून आणल्याबद्दल डॉ. कोल्हे यांनी श्री. लोणारे यांचे आभार मानले.
0 0 votes
Article Rating
153 Comments
Oldest
Newest Most Voted

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.