महाराष्ट्रात हवामानाचा मोठा यू-टर्न! मान्सून परतीचा काउंटडाउन; 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Rokhthok Maharashtra 10 0

महाराष्ट्राच्या हवामानात मोठा यू-टर्न! मान्सूनच्या परतीचा काउंटडाउन सुरू झाला असून, राज्यातील काही भागांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम बंगालच्या खाडीत आणि उत्तर प्रदेश-बिहारच्या काही भागांवर सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. त्याचबरोबर उत्तर पाकिस्तानकडून वेस्टर्न डिस्टर्बन्स भारताच्या दिशेने सरकत आहे.
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, १० ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, घाटमाथा आणि कोकणात पुढील काही दिवस हलक्या सरी आणि वादळी वाऱ्याची शक्यता कायम आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला यलो अलर्ट देण्यात आला असून, संध्याकाळनंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.
तर कोल्हापूर, सातारा आणि घाटमाथ्यावर ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
दुसरीकडे पुणे, अहिल्यानगर, सोलापूर तसेच उत्तर महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडं राहण्याचा अंदाज आहे. काही भागांत मात्र उकाडा आणि दमट वातावरणाचा त्रास जाणवू शकतो.
म्हणजेच, मान्सून निरोपाच्या वाटेवर असला तरी महाराष्ट्रात पावसाचा खेळ अजून काही दिवस सुरूच राहणार आहे!

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.