MLC घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Rokhthok Maharashtra 9 0

सासवडमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. अपघात प्रकरणाची वैद्यकीय माहिती अर्थात एमएलसी घेण्यासाठी चिंतामणी हॉस्पिटलसमोर गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी अंकित संदेश यादव आणि निलेश भालचंद्र गायकवाड या दोघांविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता ही घटना घडल्याची माहिती आहे. सेलेरो कारमधून आलेल्या आरोपींनी पोलिसांशी वाद घालत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून, सासवड पोलीस पुढील तपास करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.