पुणेकरांसाठी मोठी संधी! म्हाडाच्या 4,462 घरांची सोडत जाहीर

Rokhthok Maharashtra 40 0

पुणे आणि परिसरात स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीत तब्बल 4 हजार 462 सदनिकांची सोडत जाहीर करण्यात आली आहे.
या घरांच्या किमती सुमारे 13 लाख रुपयांपासून सुरू होणार असल्याची माहिती आहे. विविध उत्पन्न गटांसाठी या सदनिका उपलब्ध असणार असून, पात्र नागरिकांना परवडणाऱ्या दरात घर घेण्याची संधी मिळणार आहे.
या योजनेसाठी अर्ज प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे. इच्छुकांनी अर्ज करण्यापूर्वी पात्रता निकष, उत्पन्न गट, आवश्यक कागदपत्रे आणि सोडतीच्या महत्त्वाच्या तारखा तपासाव्यात.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.