हडपसरमध्ये घरफोडीचा २४ तासांत छडा; ₹3.50 लाखांचे दागिने हस्तगत!

Rokhthok Maharashtra 32 0

पुण्यातील हडपसर परिसरात घरफोडीच्या गुन्ह्याचा हडपसर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सम्राट गार्डन सोसायटी परिसरातील एका फ्लॅटमध्ये अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून बेडरूममधील लॉकरमधून सोन्याचे दागिने चोरी केल्याची तक्रार दाखल झाली होती.
तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित फैजल इसरार खान याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्याच्याकडून सुमारे ₹3 लाख 50 हजार किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आल्याची माहितीही प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, संबंधित व्यक्ती फिर्यादीकडे फर्निचरचे काम करत असल्याचेही पोलिस तपासात समोर आले. या प्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.