उरुळी कांचनमध्ये पोलिसांची धडक! मटका, दारू आणि अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई.

Rokhthok Maharashtra 8 0

पुणे ग्रामीण पोलिसांची उरुळी कांचन परिसरात मोठी कारवाई! अवैध मटका, देशी दारूचे अड्डे आणि चोरीच्या वाळूच्या वाहतुकीवर सलग दोन दिवस कारवाई करत ११ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
३१ जुलै रोजी बाजार मैदान परिसरात विशेष पथकाने छापा टाकून मटका साहित्य, देशी दारूच्या बाटल्या आणि इतर मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या आदेशानुसार आणि परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी भूषण माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
याआधी ३० जुलैच्या मध्यरात्री सोरतापवाडी येथे सापळा रचून अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त करण्यात आला. ट्रकमध्ये सुमारे पाच ब्रास वाळू आढळून आली असून ट्रक आणि वाळूसह तब्बल ३० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या सलग कारवायांनंतर उरुळी कांचन परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. काही नागरिकांनी अवैध वाहतुकीशी संबंधित आर्थिक हितसंबंध आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून पुढील तपास सुरू आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.