महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस! 9 ते 22 सप्टेंबरचा पंजाबराव डख यांचा नवा अंदाज
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अंदाज समोर आला आहे!
ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीप पिकांवरही त्याचा परिणाम होत असताना आता गणेशोत्सवाच्या काळात पाऊस पुन्हा जोर पकडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, ९ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यंत राज्यातील विविध भागांत पावसाची शक्यता आहे.
९ सप्टेंबरला काही भागांत विखुरलेला पाऊस होईल. त्यानंतर १२ सप्टेंबरपासून विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. तर १३ सप्टेंबरपासून राज्यातील अनेक भागांत पाऊस वाढण्याचा अंदाज आहे.
१४ आणि १५ सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर आणखी वाढू शकतो. पूर्व-पश्चिम विदर्भ, मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे डख यांनी सांगितले आहे.
त्यानंतर १७ ते २२ सप्टेंबरदरम्यानही विविध भागांत पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे. मात्र हा पाऊस एकाच वेळी संपूर्ण राज्यात होणार नसून वेगवेगळ्या भागांत होण्याची शक्यता आहे.
मात्र हा पंजाबराव डख यांचा अंदाज असून अधिकृत हवामान अंदाजासाठी IMDच्या सूचनांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.





