लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे शोषण, माळवाडीतील तरुणावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल…!

Rokhthok Maharashtra 1 0

 

हडपसर (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)-

17 वर्ष वय असलेल्या मुलीस लग्नाचे आमिष दाखवत वर्षभर तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या हडपसर माळवाडीमधील विकी सुनिल बामणे या युवकावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे.
विकी सुनील बामणे (वय 24 रा.सानेगुरुजी वस्ती,माळवाडी,
हडपसर) याचे पीडित मुलीच्या घरी भावाचा मित्र म्हणून जाणे येणे होते. त्यानं मुलीला आधी प्रेम असल्याचे सांगत,नंतर लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केले.वर्षभर त्यानं विविध ठिकाणी मुलीला नेऊन अत्याचार केले.
मुलीन फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.पण पालकांना तीन खर कारण सांगितलं नाही,28 एप्रिलला त्यांन शिर्डीला गेल्यावर मुलीला फोनवर दमदाटी करत संबंध तोडण्याविषयी सांगितले.मग मुलींन फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर हा प्रकार तीन आई वडिलांना सांगितला,पालकांनी हडपसर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांची सूत्र हलली, विकी बामणे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.