जमीन हडपण्यासाठी बनावट कागदपत्रे? १८ जणांवर गुन्हा!

Rokhthok Maharashtra 2 0

छत्रपती संभाजीनगरमध्ये जमीन हडपण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सावंगी परिसरातील तब्बल १७ गुंठे जमीन बेकायदेशीररीत्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करून सुमारे ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, अॅड. सुशील मुरलीधर बियाणी यांनी संबंधित जमीन २०१२ मध्ये नोंदणीकृत खरेदीखताद्वारे घेतली होती. मात्र फेब्रुवारी २०२६ मध्ये जमिनीवर बांधकामासाठी खोदकाम सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
यानंतर आरोपींकडून विविध खरेदीखते, इसार पावत्या, सातबारा उतारे आणि इतर कागदपत्रे सादर करण्यात आली. ही कागदपत्रे बनावट असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात एकूण १८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक मनोज शिंदे पुढील तपास करत आहेत.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.