PMC Action Mode! सफाई कर्मचाऱ्यांसाठी Face Scan Attendance App सुरू

Rokhthok Maharashtra 20 0

पुणे शहरातील अस्वच्छतेवर आता महापालिकेने मोठा निर्णय घेतलाय.
झाडणकाम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी आता “फेस रीडिंग अॅप” लागू करण्यात आलं आहे.
या नव्या प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांना दिवसातून तब्बल तीन वेळा हजेरी लावावी लागणार आहे.
विशेष म्हणजे… मुकादमाच्या मोबाईलमध्ये चेहरा दिसल्याशिवाय हजेरी लागणारच नाही!
काम सुरू करताना पहिली हजेरी…
आणि त्यानंतर दर चार तासांनी पुन्हा हजेरी घेतली जाणार आहे.
जर कर्मचारी आरोग्य कोठीपासून चार किलोमीटरच्या बाहेर गेला… तर हजेरी लागणार नाही.
आणि हजेरी नाही म्हणजे थेट पगार कपात!
पुणे महापालिकेत सध्या जवळपास १० हजार सफाई कर्मचारी काम करत आहेत.
यासाठी वर्षाला तब्बल १४० कोटी रुपये खर्च होतात.
मात्र अनेक कर्मचारी कामावर न येताही पगार घेत असल्याच्या तक्रारी होत्या.
रोखठोक महाराष्ट्र न्यूजने शहरातील अस्वच्छतेचा मुद्दा उचलल्यानंतर आता प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आलं आहे.
या नव्या फेस अटेंडन्स प्रणालीमुळे खरंच शहर स्वच्छ होणार का?

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.