माजी नगरसेवक दत्तात्रय ससाणे यांचे निधन हडपसर मध्ये शोककळा

Rokhthok Maharashtra 1 176

पुणे (प्रतिनिधी)

माजी नगरसेवक व सरपंच म्हणून हडपसर मध्ये दबदबा निर्माण केलेले दत्तात्रय देवराम ससाणे (वय 69) यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे यांचे ते वडील होत.
किर्लोस्कर कंपनीत कामगार नेते म्हणून सामाजिक कार्यास सुरुवात केली,
हडपसर मधील काळे बोराटे नगर नगर मध्ये अस्तित्वात असलेल्या ग्रामपंचायतचे दोन वेळा सरपंच म्हणून राजकीय कारकीर्दीत ठसा उमटवणारे दत्तात्रय ससाणे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये कार्यरत होते. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यांचे कट्टर समर्थक असलेले ससाणे यांनी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकरांशी राजकीय मतभेद झाल्याने हडपसर विकास आघाडी मधून महापालिका निवडणूक 2002 मध्ये लढविली व नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनतर काँग्रेस मधून पुन्हा 2007 साली नगरसेवक म्हणून निवडून आले, 2012 साली काँग्रेस अंतर्गत गटबाजीत स्वकीयांकडून दगाफटका झाल्याने त्यांना पराभूत व्हावे लागले. आधी भाजपमध्ये प्रवेश केला पण तेथे विचारधारा न जुळल्याने 2017 साली त्यांनी पुत्र योगेश ससाणे यांच्यासह अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. दत्तात्रय ससाणे यांचा राजकीय वारसा चालवीत योगेश ससाणे महापालिकेत निवडून गेले. सक्रिय राजकारणातून ते बाजूला झाले असले तरी सामाजिक कार्यात अग्रेसर होते. नुकतेच त्यांना त्रास होऊ लागल्याने खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली हडपसर परिसरात शोककळा पसरली. हडपसर परिसरात अनेक सामाजिक संस्था व शैक्षणिक संस्था उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. सुख दुःखात धावून जाणारे सरपंच गेल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. 

अंत्यविधीप्रसंगी खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, माजी आमदार योगेश टिळेकर यांनी श्रद्धांजली वाहिली. विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

0 0 votes
Article Rating
176 Comments
Oldest
Newest Most Voted

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.