“हे हडपसर आहे, इथं गुन्हेगारी चालते, रील करणाऱ्या ‘बादशाहाचा’ मोडला माज” जाहीर माफीनामा घेत पोलिसांनी घडविली अद्दल

Rokhthok Maharashtra 2 0

पुणे : हडपसर परिसरातील रील्स तयार करून पोलिसांना आव्हान देणाऱ्या २० वर्षीय तरुणाचा पोलिसांनी करेक्ट कार्यक्रम केला. पवन संतोष भारती (२०) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आपोपीचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट ६-च्या पोलिसांनी कारवाई करून ताब्यात घेऊन माफीनामा तयार करून घेतला आहे.

पोलिसांनी सांगितले की, बादशहा नावाने रील्स बनवून व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी शोध घेत असताना पवन भरातीबद्दल पोलिसांना माहिती मिळाली होती. पवन हा हडपसर परिसरात असणाऱ्या इंडस्ट्रियल एरियात थांबल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ताब्यात घेऊन त्याच्याकडून व्हीडिओद्वारे माफीनामा तयार करून घेतला. तसेच यापुढे अशी चूक करणार नाही, असे त्याने या माफीनाम्यात म्हटले आहे.

सोशल मिडीयावर अशा प्रकारचे व्हिडिओ टाकणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येणार असून सोशल मीडियावर व्हिडिओ टाकताना काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पुण्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांकडून योग्य त्या उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे गुन्हेगारांना आळा बसवण्यासाठी पोलिसांनी पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.