Crime news : हडपसरमधील एका टोळीवर मोक्का; पोलीस आयुक्तांकडून आत्तापर्यंत पुणे शहरातील 80 टोळ्यांवर कारवाई…!

Rokhthok Maharashtra 1 0

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : हडपसर भागात दहशत माजवणाऱ्या आणखी एका गुंड टोळीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्काची कारवाई केली आहे.कारवाई करण्यात आलेल्या टोळीच्या अनेक दिवसांपासून तक्रारी येत होत्या. कारण टोळीने परिसरात मोठ्या प्रमाणात दहशत माजवत होती. दरम्यान, या टोळीवरील कारवाईने पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी वर्षभराच्या आत तब्बल 80 टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाया केल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारांच्या मनात धडकी भरली आहे.

 

संबधीत टोळीतील अटक केलेल्यांपैकी तीन अल्पवयीन मुलेही ताब्यात घेण्यात आली आहेत. बाबू नामदेव मिरेकर ( वय 54 ), आकाश हनुमंत कांबळे ( वय 20 ), अमन नवीन शेख ( वय 23 ), सरताज नबीलाल शेख ( वय 20 ), सनी रावसाहेब कांबळे ( वय 23 ), रोहित शंकर हनुवते ( वय 22, सर्व रा. वैदुवाडी, हडपसर ) अशी मोक्का कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
वैदुवाडी परिसरात बाबू मिरेकरने टोळी तयार करुन दहशत माजविली होती.

 

आरोपी सनी कांबळे, अमन शेख, आकाश कांबळे आणि तीन अल्पवयीन मुलांना वैमनस्यातून एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले होते. टोळीवर खंडणी उकळणे, दहशत माजविणे, धमकावणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मिरेकर टोळीवर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र शेळके यांनी तयार केला होता.

उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यामार्फत अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे तो प्रस्ताव पडताळणीसाठी पाठविण्यात आला होता. प्रस्तावास पडताळणी केली व तो मंजुरीसाठी पोलीस आयुक्तांना पाठविला. पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी प्रस्तावाला मंजुरी देऊन मिरेकर टोळीवर मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.